पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटूंब मतदान केले

लोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आशा-आकांक्षा असतात. पण त्या पूर्ण करायच्या असतील तर मतदान केले पाहिजे. मतदान करतील त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आपल्या आईसोबत नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास

मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोणतेही राजकीय मतप्रदर्शन करण्यास नकार दिला. आचारसंहिता सुरू आहे. आमची भूमिका आम्ही जाहीरनाम्यात मांडली आहे, असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की त्यांनी मतदानाला गेले पाहिजे. मतदानाचे महत्त्व वेगळे असते. लोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आशा-आकांक्षा असतात. पण त्या पूर्ण करायच्या असतील तर मतदान केले पाहिजे. जे मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chief minister devendra fadnavis appeals voter to vote in maharashtra assembly election 2019