मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. ही महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झाली. यावेळी महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कोंबड्या आणि अंडी फेकण्यात आली. ताकारी ते कुंडल मार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेचा ताफा अडवत हे आंदोलन करण्यात आले.
#ब्रेकींग न्यूज : इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या.@HTMarathi pic.twitter.com/XHtg0GAE5W
— Deshpande Shrinivas (@shrinihtpune) September 16, 2019
'नाणारचं' जे झालं तेच 'आरेचं' होईल, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांचा ताफा सांगलीमध्ये दाखल होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ५ ते ६ कार्यकर्ते ताकारी ते कुंडल मार्गावर रस्त्याच्याकडेला उभे होते. महाजनादेश यात्रेचा ताफा येताच त्यांनी रस्त्यावर येऊन ताफा अडवला. ताफ्यातील गाड्यांवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून मारत घोषणाबाजी केली.
'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन'
कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ घोटाळा प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी तसचं सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांना पाणी द्यावे, पूरग्रस्तांना त्वरीत मदत करावी या मागण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
'देवच या देशाचं रक्षण करो'; वाढदिवसानिमित्त चिदंबरम यांचे टि्वट