पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही मरगळ नाही'

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही मरगळ नसल्याचे पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

...तर मनमोहन सिंग पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करणार होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी येत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहेत. पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकामागून एक नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीतील परफॉर्मन्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्वामी चिन्मयानंद प्रकरण: पीडित तरुणीने दिला आत्महत्येचा इशारा

नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये कोणतेही नवल नाही. त्यांच्या सभांसाठी सगळीकडेच जोरात तयारी सुरू असते, असाही टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.