पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल पण आधी पुण्यातली परिस्थिती नीट हाताळा, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. 

कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी

छगन भुजबळ म्हणाले, सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही. आधी सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळीही सत्ताधारी तिथे गेले नाही. आता पुण्यात पूर आला आहे. तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री तिकीट वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. तिकीट वाटपाची चर्चा दोन दिवसांनी झाली तर काहीही बिघडणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

पुण्यात पावसाने नक्की काय झालंय डोळ्याने पाहा...

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. आता पुण्यात पूर आला आहे. त्यावेळी पालकमंत्री दिल्लीत आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी जनता नाही तर सत्ता सर्वोच आहे. हे केवळ अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम करताहेत, असे त्यांनी म्हटले आहे.