पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये भाजपकडून हालचालींना वेग; नगरसेवकांना सहलीवर पाठवणार

चंद्रपूर नगरसेवक

महापौर पदाची निवडणूक पुढच्या आठवड्यात होणार असून या निवडणुकीसाठी राज्यात जोरदार तयारी सुरु झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. असामध्ये महापौर निवडणुकीमध्ये चंद्रपूरमध्ये आपली सत्ता कायम रहावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आपले नगरसेवक सहलीवर पाठवण्याची तयारी करत आहे.

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळं त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. यावेळी महापौरपदाचं आरक्षण सर्वसाधारण गटातील खुला प्रवर्ग महिलांसाठी निघाले. त्यामुळं आता राजकीय हालचालींना वेग आलाय. 

गोव्यात मिग विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

मावळत्या महापौर अंजली घोटेकर यांनी आज सर्व सदस्यांसोबत फोटो काढले. आता एक-दोन दिवसांत भाजप आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा विचार करीत आहे. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. आम्हाला कुठलीही भीती नसून नगरसेवकांची इच्छा असल्यास त्यांना सहलीवर पाठवू, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

बलात्कारानंतर मदतीसाठी आलेल्यांनीच पुन्हा तरुणीवर केला

चंद्रपूर महापालिकेत भाजपमध्ये महापौरपदासाठी यावेळी अनेकांची नावं चर्चेत आहेत. वंदना तिखे, अनुराधा हजारे, राखी कंचरलावर, आशा आबोजवार यांची नाव महापौरपदासाठी चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडे अतिशय कमी संख्या असल्यानं पक्षनेते भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तरी सुध्दा भाजपने नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बिहारमध्ये बॉयलरचा स्फोट; चौघांचा मृत्यू