पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्याय मिळेल पण बोलण्यातून जखमा करू नका, चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

चंद्रकांत पाटील

गेल्या काही काळात पक्षात काही चुका झाल्या असतील. पण ज्या चुका झाल्या त्या पक्षाच्या नाही तर माणसांच्या चुका होत्या. भविष्यात या चुका दुरुस्त केल्या जातील. प्रत्येकाला न्याय मिळेल. पण तोपर्यंत थोडा धीर धरा. बोलण्यातून जखमा करू नका, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी गोपीनाथ गडावरील भाषणात सांगितले. भाजपमधील नाराजांना उद्देशून त्यांनी हे विधान केले. 

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे वाढवले...

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी आपले मन मोकळे करताना राज्यातील भाजप आणि नेतृत्त्वावर कोणाचेही नाव न घेता टीका केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ते म्हणाले, एकनाथ खडसे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या. ते ऐकून त्यांचे दुःख मी समजू शकतो. त्यांच्या व्यथांची नक्कीच दखल घेतली जाईल. उत्तर काढले जाईल. पण सध्या बोलण्यातून जखमा करू नका. नाहीतर भविष्यात जेव्हा न्याय मिळेल त्यावेळी या जखमांमुळेच अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते, असे सूचकपणे त्यांनी सांगितले. गेल्या काही काळात ज्या चुका झाल्या त्या पक्षाच्या नाहीतर माणसांच्या चुका होत्या, असेही त्यांनी सांगितले.

रेस्तराँबाहेरचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे तरुणाला पडले महागात...

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी संपूर्ण कुटुंबाला सावरले. त्यांनी समाजालाही सावरले. पाच वर्षांत त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले. पण त्या आरोपांना घाबरल्या नाहीत. त्या सक्षमपणे आपले काम करीत राहिल्या, याकडेही चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले.