पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'

चंद्रकांत पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्या दरम्यान मनातील खदखद व्यक्त केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरात प्रतिक्रिया दिली. 'परळीच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सांगितले अनेकांनी बंड केले आणि त्यांच्यामुळेच इतिहास घडला. मात्र, बंड, भांडण हे आपल्या लोकांविरुध्द करायचे नसते. आपल्या लोकांसोबत चर्चा करायची असते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी: नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

सोलापूरातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला की, अडचणी येत असतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोला. अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. मात्र रोज उठून पक्षाविरुध्द कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही. सध्या वातावरण वेगळे आहे. आपल्याला बक्षिस दिले जाईल त्याचसोबत शिक्षा देखील दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

शरद पवारांच्या बर्थडे दिवशी ठाकरे-पवार कुटुंबिय एका फ्रेममध्ये

दरम्यान, परळीमध्ये जाण्यापूर्वी अनेकांनी सांगितले जाऊ नका. लोकं तुम्हाला बोलू देतील का? तुमच्यावर अंडी फेकलीत. मात्र तरी सुध्दा मी परळीला गेले. तिथल्या लोकांशी संवाद साधला. आजचं चित्र वेदना देणारे असले तरी मी गेलो नसतो तर तीव्रता आणखी वाढली असती, असे चंद्रकांच पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. पण जेवढे दिवस ते सत्तेवर राहिल तेवढ्या दिवसात ते महाराष्ट्राची वाट लावलीत, असे त्यांनी सांगितले. 

लग्न करुन देत नसल्याने मुलाने कुऱ्हाडीने केली आईची हत्या