पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका चतुर्वेदींचं इंग्रजी चांगलं, म्हणून त्यांना संधीची शक्यता, खैरेंचा टोमणा

प्रियांका चतुर्वेदी आणि चंद्रकांत खैरे

शिवसेनेच्या वतीने राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, चतुर्वेदींच्या उमेदवारीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार आणि उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदारकीची मला आवश्यकता नव्हती पण माझ्या मराठवाड्याला माझी गरज होती. गेली २० वर्षे मी लोकसभा गाजवली. परंतु, प्रियांका चतुर्वेदी चांगलं काम करतील. त्या इंग्रजी चांगल्या बोलतात, असा टोला त्यांनी लगावला. 

आता आठवले म्हणाले, गो.. महाविकास आघाडी गो...!

'एबीपी माझा'शी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यसभेची संधी मिळाली असती तर लढण्यासाठी बळ मिळाले असते. पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते. मी बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे. मी यासाठी पक्षाकडे जाणार नाही. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावले तरच मी त्यांच्याकडे जाईन, असेही ते म्हणाले. 

कोरोना विषाणू इफेक्ट; अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच

औरंगाबादेत मी मुसलमानांविरोधात उभा राहिलो. आजही एकट्याच्या जोरावर महापालिका निवडणुका जिंकेन. पक्षाला सत्तेवर आणून दाखवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

प्रियांका चतुर्वेदी या काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आहेत. त्यांचे हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यामुळे त्या दिल्लीत शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतात, असे शिवसेनेला वाटत असल्याचे बोलले जाते. हाच धागा पकडून चंद्रकांत खैरे यांनी अप्रत्यक्षरित्या आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chandrakant khaire slams on priyanka chaturvedis candidature for rajya sabha election from shiv sena