पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विठूरायाच्या चंदन उटी पूजेला प्रारंभ

विठ्ठल-रूक्मिणीच्या चंदन उटी पूजेचा प्रारंभ

पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या परंपरागत चंदनउटी पूजेला सुरुवात झाली. गुरूवारी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रूक्मिणीच्या चंदन उटी पूजेचा प्रारंभ झाला. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. यावेळी मंदिरातील महालक्ष्मी, व्यंकटेश, राधिकामाता, सत्यभामा यांना देखील चंदनउटी पूजा करण्यात आली. श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीतर्फे दरवर्षी मार्चपासून ते जून महिन्यापर्यंत चंदन उटी पूजा करण्यात येते.

कोरोनाशी लढा : राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दररोज होणाऱ्या पूजा मंदिर समितीच्या वतीनेच करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या रोजच्या चंदनउटी पूजेसाठी ७५० ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. पुढचे तीन महिने उन्हाची तीव्रता अधिक असते त्यामुळे श्री विठुरायाला उष्म्यापासून दिलासा मिळावा म्हणून चंदनाचा लेप त्याच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो.

कोरोना : CRPF कडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांची मदत

चंदनउटी पूजा करण्यासाठी खास बंगळुरुवरून उच्च दर्जाचं चंदन खरेदी करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदनयुतीची पूजा केली जाते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते. विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप लावण्यात येणार आहे. मागच्या वर्षी रूक्मिणी मातेच्या ३४ पूजा आणि विठ्ठलास १२१ चंदनउटी पूजा झाल्या होत्या. या पूजेतून मंदिर समितीस २० लाख ७० हजार १५५ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.