पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश; मराठा आरक्षण अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान

प्रतिकात्मक छायाचित्र

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. सोमवारी न्यायालयाने राज्याचे महाअधिवक्ता, राज्य सरकार आणि सीईटी सेलला नोटीस बजावत १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारचा अध्यादेश अवैध असून तो रद्द करावा आणि याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत प्रवेश प्रक्रिया व आरक्षण स्थगित ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. 

मराठा आरक्षण : शैक्षणिक प्रवेशासाठीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना याच वर्षीपासून मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून हा वाद सुरु आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आल्याने ते यावर्षी लागू करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयातही त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमध्ये १६ टक्के आरक्षण कायम ठेवले. त्या अध्यादेशाला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार देत विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. 

सरकारला फसवायचंच होतं, मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंची टीका

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षापासून मराठा समाजातील मुलांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आणलेल्या वटहुकूमावर राज्यपास सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी स्वाक्षरी केली होती. महाराष्ट्र राज्य आरक्षण (शिक्षण संस्थांमधील प्रवेश, सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या आणि राज्यातील पदे) सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (सुधारणा) वटहुकूम २०१९ वर राज्यपालांनी स्वाक्षरी केली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:challenge on medical pg admission maratha reservation Ordinance in mumbai high courts nagpur bench