पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अट्टल साखळीचोरांवर MPDA अन्वये कारवाई शक्य, मुंबई हायकोर्ट

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चोरी

सातत्याने साखळीचोरीसारखी गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या आरोपींना महाराष्ट्र धोकादायक कृत्ये नियंत्रण कायद्यान्वये प्रतिबंधात्मकपणे जास्त कालावधीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला.

अजितदादा आपण उगाच इतकी वर्षे वेगळे राहिलो, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने हा आदेश दिला होता. तो १२ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. राजेंद्र चांडोल यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. औरंगाबादमधील सिडको पोलिस ठाण्याकडून रांजेद्र चांडोल यांच्यावर एक वर्षासाठी प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश निघाले आहेत. त्यांच्याविरुद्ध पाच वेगवेगळ्या एफआयआर दाखल झाल्यानंतर सिडको पोलिसांनी ही कारवाई केली. राजेंद्र चांडोल यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना प्रतिबंधात्मक अटक १२ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी असू शकत नाही, असे सांगितले. पण न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर वाटलं गोमांस

न्या. टी व्ही नलावडे आणि न्या. एम जी सेवलीकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. साखळीचोरीच्या काही घटनांमध्ये संबंधित पीडितेला आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या स्वरुपाचे गुन्हे हे धोकादायक या श्रेणीत मोडतात, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.