पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दाखल

शेतीचे नुकसान

राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पाहणी पथक तीन दिवसांचा दौरा करणार आहे. हे पथक औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिकमध्ये पाहणी दौरा करणार आहे. पाच सदस्यीय समिती नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

केंद्रीय पहाणी पथक २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहेत. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही. तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन पाहणी दौरा करणार आहेत. नागपूर आणि अमरावती विभागात डॉ. आर. पी. सिंग पाहणी दौरा करणार आहे. तर नाशिक विभागात दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्र पाहणी दौरा करणार आहेत. या पाहणीनंतर हे पथक पीकांच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे. 

'सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचा संपर्क फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीशी'

यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत आला आहे. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटत नसल्याने मदत नेमकी कोणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशामध्ये केंद्राने मदत करावी अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असल्यामुळे राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याची तक्रार काँग्रेस, शिवसेना आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. 

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख