पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० वरुन ५० रुपये

रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटमध्ये वाढ केली आहे. १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्सुनामी येते आहे, अर्थव्यवस्थेवरून राहुल गांधींचा सूचक इशारा

रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर या रेल्वे विभागांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिटमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सांगितले. 

भारतातील पहिल्या महिला मरिन पायलट कोरोना संशयित

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. तर मंगळवारी मुंबईमध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी व्हावी यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला. 

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित