पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंकी हिल ते कर्जत दरम्यान ३० नोव्हेंबरपर्यंत मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जत दरम्यान आणखी महिनाभर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामांसाठी आणखी महिनाभर म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत अप मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्या आल्या आहेत. २१ ऑक्टोबर रोजी या मार्गावर १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र या कालावधीत दुरुस्तीचे कामं पूर्ण न झाल्यामुळे ब्लॉक कालावधी वाढवण्यात आला आहे. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत

ब्लॉक दरम्यान, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड पनवेल एक्स्प्रेस, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. मंकि हिल ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कामामुळेच २२ एक्स्प्रेसलच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला आहे. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत

मुंबई-पुणे घाटात मेल-एक्स्प्रेस वाहतूकीसाठी तीन मार्गिका आहेत. लोणावळा घाटात मंकी हील घाटात सुरु असलेल्या कामांमुळे अप मार्ग बंद करण्यात आला. या दुरुस्ती कामाला आणखी महिनाभर लागणार असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. कारण दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांना मुंबईत परत येताना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागणार आहे. 

महायुतीतील इतर घटक पक्षांना चार मंत्रिपदे द्या, आठवलेंची मागणी

रद्द राहणाऱ्या गाड्या - 

 - मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस

-  मुंबई-पंढरपुर-मुंबई एक्स्प्रेस

-  मुंबई-बीजापुर- मुंबई एक्स्प्रेस 

-  पनवेल-  नांदेड-पनवेल साप्ताहिक एक्स्प्रेस

- पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर एक्स्प्रेस

या गाड्या पुण्यापर्यंत धावणार -

- मुंबई- कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस

- मुंबई- हैद्राबाद - मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस 

- एलटीटी-विशाखापट्टनम- एलटीटी एक्स्प्रेस

- एलटीटी- हुब्बल्ली-एलटीटी एक्स्प्रेस

- पनवेल- नांदेडड-पनवेल एक्स्प्रेस 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:central railway get one month megablock between karjat and monkey hill because technical work