पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मध्य रेल्वेने २३ लांबपल्ल्यांच्या गाड्या केल्या रद्द

मध्य रेल्वेवर ब्लॉक

राज्यामध्ये कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. या विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने २३ लांबपल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्या आहेत. 

सरकारी कार्यालये सात दिवस बंद राहणार, राज्य सरकारचा निर्णय

गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी २३ लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये काही गाड्या २९ तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या ३१ तर काही गाड्या १ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

त्सुनामी येते आहे, अर्थव्यवस्थेवरून राहुल गांधींचा सूचक इशारा

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० वर पोहचली आहे. तर मुंबईमध्ये मंगळवारी एका कोरनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्ल्रटफॉर्म तिकीटात वाढ केली. गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० वरुन ५० रुपये करण्यात आले आहे.

भारतातील पहिल्या महिला मरिन पायलट कोरोना संशयित

मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या खालीलप्रमाणे -

- मुंबई- पुणे डेक्क्न एक्स्प्रेस - १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रद्द.

- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस - १८ मार्च ते ३० मार्चपर्यंत रद्द.

- एलटीटी-अजनी एक्स्प्रेस - २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रद्द.

- अजनी - एलटीटी एक्स्प्रेस - २० मार्च ते २७ मार्चपर्यंत रद्द.

- एलटीटी - निजामाबाद एक्स्प्रेस - २१ मार्च ते २८ मार्चपर्यंत रद्द.

- निजामाबाद - एलटीटी एक्स्प्रेस - २२ मार्च ते २९ मार्चपर्यंत रद्द.

- नागपूर - रेवा एक्स्प्रेस - २५ मार्चला रद्द.

- मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस - २३ मार्चपासून ते १ एप्रिलपर्यंत रद्द.

- नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस - २२ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत रद्द.

- पुणे- नागपूर एक्स्प्रेस - २६ मार्चपासून ते २ एप्रिलपर्यंत रद्द.

- नागपूर- पुणे एक्स्प्रेस - २० मार्चपासून ते २७ मार्चपर्यंत रद्द.

- पुणे- अजनी एक्स्प्रेस - २१ मार्चपासून ते २८ मार्चपर्यंत रद्द.

- अजनी- पुणे एक्स्प्रेस - २२ मार्चपासून ते २९ मार्चपर्यंत रद्द.

- एलटीटी- मनमाड एक्स्प्रेस - १८ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत रद्द.

- मुंबई- पुणे प्रगती एक्स्प्रेस -  १८ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत रद्द.

- पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस - १९ मार्चपासून ते १ एप्रिलपर्यंत रद्द. 

- भुसावळ- नागपूर एक्स्प्रेस - १८ मार्चपासून ते २९ मार्चपर्यंत रद्द. 

- नागपूर -भुसावळ एक्स्प्रेस - १९ मार्चपासून ते ३० मार्चपर्यंत रद्द. 

- कलबुर्गी- सिकंदराबाद एक्स्प्रेस - १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रद्द. 

- हावडा - मुंबई दुरांतो एक्स्प्रेस - २४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रद्द. 

- मुंबई- हावडा दुरांतो एक्स्प्रेस - २५ मार्च ते १ एप्रिलपर्यंत रद्द.

- सीएसएमटी - निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस - २० मार्च, २३ मार्च, २७ मार्च आणि २० मार्च रोजी रद्द. 

- निजामुद्दीन- सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस - २१ मार्च, २४ मार्च, २६ मार्च आणि ३१ मार्च रोजी रद्द.