पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार

केंद्राने एल्गार परिषदेप्रकरणातील तपास एनआयएकडे वर्ग केला आहे.

राज्य सरकार आढावा घेत असलेल्या एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. एल्गार परिषेदेच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जावे, अशी सूचना त्यांनी आपल्याच पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला केली होती. 

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी या प्रकरणाचा आणि पोलिस तपासाचा आढावा घेतला होता. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारच्या हालचाली सुरु असताना केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.  मागील सरकारने केलेल्या चुका समोर येतील म्हणून तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

राज ठाकरेंना मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का?; इम्तियाज जलीलांचा सवाल

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जे वास्तव आहे ते समोर यावे म्हणून हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून  विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपास करण्याच्या दिशेने हालचाली सुरु असताना हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्यामुळे केंद्र आणि राज्य वाद चव्हाट्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.