पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ... अशा पद्धतीने दहावीच्या परीक्षेत सुरू आहे कॉपी

सुरक्षा भिंतीवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना. (फोटो सौजन्य - एएनआय)

दहावीच्या परीक्षेत ग्रामीण भागात कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी चिठ्ठ्या पुरविल्या जातात, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एएनआयने हा व्हिडिओ तयार केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा व्हिडिओ आहे.

कोरोना झालेले इटलीतील दाम्पत्य राजस्थानात ६ जिल्ह्यांत फिरले होते

व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूला असलेल्या सुरक्षा भिंतीवर चढून काही मुले आणि तरूण आतमध्ये परीक्षा देत असलेल्या परीक्षार्थींना उत्तरांच्या चिठ्ठ्या पुरवित असल्याचे दिसते. कॉपी पुरविण्यासाठी बाहेर उभी असलेली मुले एकमेकांना मदत करीत असल्याचे दिसते. सुरक्षा भिंतीवर चढण्यासाठी मदत केली जात असल्याचे व्हिडिओत दिसते. त्याचबरोबर काही मुले वर्गामध्ये चिठ्ठ्या पाठवत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.

कोरोनाची दहशत: कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे ट्विटरचे निर्देश

या संदर्भात या परीक्षा केंद्राचे नियंत्रक ए एस चौधरी म्हणाले, शाळेच्या सभोवती असलेली सुरक्षा भिंत अद्याप पूर्ण झालेली नाही. त्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच आम्हाला या वर्षी हा प्रश्न भेडसावतो आहे. आम्ही पोलिसांकडे शाळेभोवती सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. आम्ही यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करतो आहोत. दहावीची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.