पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संचारबंदीचे उल्लंघन: भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल

भाजप आमदार सुरेश धस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी दरम्यान गावाकडे परतणाऱ्या बीडमधील ऊसतोड मजुरांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समजताच आमदार सुरेश धस त्यांच्या मदतीसाठी भिगवण (अहमदनगर) येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी ऊसतोड मजुरांसोबत ठिय्या आंदोलन केले होते. 

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार

बुधवारी दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी गेलेले ऊसतोडणी मजूर बीडमधील आपल्या गावाकडे परत येत होते. त्यांना भिगवण येथे पोलिसांनी मारहाण केली. ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती कळताच सुरेश धस बुधवारी रात्रीच बीड जिल्ह्याच्या सीमा ओलांडून भिगवण येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी ऊसतोड मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ठिय्या आंदोलन करत पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध केला. 

'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'

भाजप आमदार सुरेश धस यांनी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक प्रशांत क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश धस यांच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती