पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाधवान कुटुंबातील २३ जणांवर गुन्हा दाखल, महाबळेश्वरमध्ये केले क्वारंटाइन

कपिल वाधवान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशात लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाणे डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान यांना महागात पडले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील २३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच, त्यांना पुढच्या १४ दिवसांसाठी पाचगणीतील एका खासगी रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

वाधवान कुटंबीयांना मदत करणे भोवले, प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर

वाधवान कुटुंबीय लॉकडाऊनचे उल्लंघन करत खंडाळ्यावरुन महाबळेश्वर येथे गेले. याप्रकरणी वाधवान कुटुंबातील २३ जणांविरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीच्या एका खासगी रुग्णालयात या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणाऱ्या विशेष प्रधान सचिवांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबईत निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, लॉकडाऊन प्रभावी करण्यासाठी SRPFची मदत

वाधवान यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणे गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवांना चांगलेच भोवले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे. या प्रकरणामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. 

कोरोनामुळे राज्यातील ५ कारागृहे 'लॉकडाऊन'