पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कार-ट्रकचा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

अक्कलकोट येथे अपघात झाला

देव दर्शनासाठी जात असताना सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अक्कलकोट शहराजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली. जखमींवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात सकाळी ९ च्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

अक्कलकोट येथे शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

सोलापूर येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी काही भाविक (एमएच १२ केपी ७९७१) या कारने जात होते. अक्कलकोट शहराजवळ आल्यानंतर समोरुन येणाऱ्या ट्रकला कारने जोराची धडक दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमींना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.