पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: आंदोलकांना शांतता राखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ANI)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी बीडसह राज्यातील काही भागात या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. बस पेटवून देणे आणि वाहनांच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता बाळगावी. कोणाचाही हक्क हिरावला जाणार नाही. प्रत्येकाचे रक्षण करण्यास महाराष्ट्र सरकार समर्थ आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नागरिकांनी लोकशाही पद्धतीने कायदा हातात न घेता आंदोलन करावे. कुठेही हिंसाचार करु नये. सुधारित नागरिकत्व कायद्याची वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आणखी सुनावणी व्हायची आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी. 

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीः नितीश कुमार

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी काळजी करु नये. कोणत्याही जाती, धर्माच्या नागरिकाचा हक्क हिरावला जाणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागपूर येथे विधिमंडळाबाहेर म्हटले. 

'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'

दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, बीड, अमरावती हिंगोली, परभणीसह विविध भागात आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, परभणीत अग्निशामक दलाच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. बसचीही तोडफोड करण्यात आली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:caa I appeal to people of Maharashtra to maintain peace and calm says CM Uddhav Thackeray