पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता

उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. आता पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात लोकसभेची निवडणूक होईल, असा अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

शिवाजी महाराजांचे विचार भाजपच पुढे नेत आहे, उदयनराजेंचा भाजपत प्रवेश

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जर कोणी राजीनामा दिला असेल, तर तेथील पोटनिवडणूक ही मूळ निवडणुकीसोबतच होते, असे आतापर्यंत घडत आले आहे. उदयनराजे यांनी कालच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अर्थात हा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

युतीला किती जागा मिळतील याचा अमित शहांनी व्यक्त केला नवा अंदाज

चारच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले सातारा मतदारसंघातून निवडून आले होते. पण भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे त्यांनी राजीनामा देणे क्रमप्राप्त होते. अखेर शुक्रवारी रात्री त्यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:byelection of satara lok sabha constituency will be held with maharashtra assembly election 2019