पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

उदयनराजे भोसले

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला. पण यावेळी साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने केवळ बिहारमधील समस्तीपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.

दिवाळीपूर्वीच राज्यात नवं सरकार सत्तेत

गेल्या शनिवारीच साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला होता. विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जर कोणत्या आमदार किंवा खासदाराने राजीनामा दिला असेल, तर तेथील पोटनिवडणूकही पुढील निवडणुकीसोबतच घेतली जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यादिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण सध्या तरी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात साताऱ्यातील लोकसभेच्या जागेचा उल्लेख केलेला नाही. आता यावर उदयनराजे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उदयनराजे यांनी भाजपमध्ये येण्यापूर्वी काही अटी घातल्या होत्या. त्यापैकी एक अट म्हणजे विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याची अट घालण्यात आली होती, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे आहेत महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ, २१ ऑक्टोबरला इथे मतदान

एकूण ६४ विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी आयोगाने जाहीर केला. त्यामध्ये केवळ बिहारमधील समस्तीपूर येथील एकमेव लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bye election of satara lok sabha constituency will not be held with maharashtra assembly election 2019