पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकल, एक्स्प्रेसबरोबर आता एसटी सेवाही बंद!

एसटी बसेस

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकल, एक्स्प्रेसबरोबर आता राज्यातील एसटीसेवाही बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी सेवा ही गावागावांना जोडते, मोठा ग्रामीण भाग हा एसटी सेवेनं जोडला आहे. राज्यातल्या राज्यात एसटीचं मोठं  जाळं आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार  रोखण्यासाठी एसटीसेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

केवळ अत्यावश्यक सेवेसांसाठी  बस सेवा या सुरु राहतील. या बसनं केवळ अत्यावश्यक गोष्टींची ने- आण होईल किंवा या सेवा पुरवणारे कर्मचारीच याचा वापर करतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मेल- एक्स्प्रेस सेवा रद्द 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद  राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

३१ मार्च पर्यंत रेल्वेसेवा बंद, देशाची वाटचाल लॉक डाऊनच्या दिशेने

मुंबई लोकल बंद 
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल सेवाही बंद होणार आहे. आज केवळ ओळखपत्र  पाहून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना  रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जात होता.