पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलढाणा श्वान मृत्यू प्रकरण: अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा श्वान मृत्यू प्रकरण

बुलढाणा शहराजवळ काही अंतरावर असलेल्या गिरडा जंगलात शुक्रवारी शेकडो श्वान हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यामधील ९० श्वानांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जिल्हा पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी गिरडा शिवाराचे वनपाल राजेश शिपे यांच्या तक्रारीवरुन बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

बुलढाणा जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. श्वानांचे हात-पाय बांधून त्यांना क्रुरतेने जीवे मारल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानांना कोणी मारले, का मारले तसंच गिरडा जंगलात कोणी आणून टाकले या सर्व बाबींवर पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, हे श्वान भोकरदन येथून आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने तपास सुरु आहे. 

'घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका, देतो राजीनामा...'

गिरडा गावाजवळ असलेल्या जंगलातील रस्त्याच्या कडेला ९० श्वान मृतावस्थेत आढळले होते. हात-पाय बांधून जंगलातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना टाकण्यात आले होते. गिरडा, पाडळी, हनवतखेड यासह आसपासच्या अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ही बाबत समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच वनपाल, वनरक्षक यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत श्वानांना ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदन करुन जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून या सर्व श्वानांची विल्हेवाट लावण्यात आली. 

इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने भारतात मागितले शरण