पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावमध्ये बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव शहरातील एका बांधकाम विकासकाने (बिल्डरने) बांधकाम सुरू असलेल्या साइटवरील एका गाळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (वय ५४) असे मृत बिल्डरचे नाव आहे. 

लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच जोडप्याची आत्महत्या

सूर्यवंशी यांच्या जळगाव शहरात काही भागात बांधकाम साइट सुरू आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते वेगवेगळ्या साइटवर कामांची पाहणी करीत होते. दुपारी बाराच्या सुमारास ते एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर तालुका पोलिस ठाण्यासमोर सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या साइटवर गेले. तेथील तळमजल्यावरील एका गाळ्यात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पारनेरमध्ये जावयाने गोळ्या झाडून केला सासूचा खून

त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण काही दिवसांपासून ते कोणत्यातरी कारणाने तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.