पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना भाजपत घ्या, दानवेंचा सल्ला

रावसाहेब दानवे

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी राहायला तयार नाही, सोनियाही हे पद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांना तिसरा माणूस सापडत नाही. आता विरोधक उरलेलेच नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना तुमच्यात घ्या,' असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. 

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५१ महिलांना उमेदवारी दिली व त्यातील ४१ महिलांना विजयी केल्याची माहिती रहाटकर यांनी यावेळी दिली. 

'फिर एक बार शिवशाही सरकार', 'अबकी बार २२० के पार'; भाजपची नवी घोषणा

दरम्यान, गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने जिंकलेली एकही जागा सोडणार नसल्याचे दानवे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.