पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले, पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल

लाच (प्रतिकात्मक छायाचित्र)

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारताना एका पोलिस नाईकला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी संबंधित पोलिसासह एका पत्रकारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच स्वीकारणाऱ्या पोलिस नाईकचे नाव नितीन संभाजी सुरवसे तर पत्रकाराचे नाव प्रवीण चंदू राठोड असे आहे. दोघांविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

न्याय बदल्याच्या भावनेतून दिला जाऊ नये, CJI बोबडे यांचे सूचक

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराच्या नातूवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलिस नाईक नितीन सुरवसे यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती एक हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे  निश्चित झाले. तक्रारदाराने याबाबत उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार नोंदवली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना नितीन सुरवसे यांना रंगेहाथ पकडले. दुसरे संशयित आरोपी बहुजन महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे पत्रकार प्रवीण राठोड यांनी त्यास प्रोत्साहन दिले. यावरून त्यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : आदर राखून कोहलीनं पुरा केला हिशोबाचा फेरा