पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा आरक्षणासाठी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांना जन्म घ्यावा लागलाः जानकर

महादेव जानकर

इतकी वर्षे सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व होते. पण ते समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथील माळी समाजाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. दरम्यान, जानकर यांच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले. अनेकांनी जानकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

सरकारचा मोठा निर्णय! धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सवलती मिळणार

जानकर पुढे म्हणाले, १९०२ मध्ये पहिले आरक्षण छत्रपती शाहू राजांनी दिले. मात्र त्याच शाहूंच्या जातीला आजही आरक्षण मागायची वेळ का आली, असे म्हणत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचे नाव घेत जानकर यांनी समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांची दुर्दशा का संपली नाही, असा सवाल केला. दोन्ही काँग्रेसचे २५ आमदार संपर्कात असल्याचे सांगत आमदार शिंदे यांना राष्ट्रवादी सोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभेला जयंत पाटील यांचा पराभव होणार: चंद्रकांत पाटील

यापूर्वीही जानकर हे आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Brahmin CM had to be born for Maratha reservation Mahadev Janakars Controversial Statement