पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्न करुन देत नसल्याने मुलाने कुऱ्हाडीने केली आईची हत्या

सातारा क्राईम

साताऱ्यामध्ये मुलाने जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागच्या मुलांची लग्न झाली माझं लग्न का करत नाही या रागातून मुलाने आईची हत्या केली आहे. खटाव तालुक्यातील मोराळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वडूज पोलिसांनी आरोपी किरण शिंदे (२८ वर्ष) याला अटक केली आहे. 

राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी: नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

किरण शिंदेने राहत्या घरी ११ डिसेंबर रोजी रात्री आईची हत्या केली. माझ्या मागच्या मुलांची लग्न झाली. माझं लग्न का करत नाही असं म्हणत किरणने आधी आईसोबत भांडण केले. त्यानंतर संतप्त झालेल्या किरणने घराचा दरवाजा बंद करत आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केली. कांताबाई शिंदे (५५ वर्ष) असं मृत महिलेचे नाव आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयक आंदोलन: पोलीस फायरिंगमध्ये

दरम्यान, हत्येनंतर किरणने घराचा दरवजा उघडला नाही. तो घरामध्येच बसून होता. जर कोणी दरवाजा तोडून आत येण्याचा प्रयत्न केला तर त्याची देखील हत्या करेल असा इशारा त्याने दिला होता. त्यानंतर किरणच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

एवढा राग बरा नव्हे! त्या १६ वर्षीय तरुणीला ट्रम्प यांचा सल्ला