पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा आरक्षणावर येत्या गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई हायकोर्ट

राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या गुरुवारी निकाल येणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निकालावरच मराठा आरक्षणाचे पुढे काय होणार हे निश्चित होणार आहे.

राधाकृष्ण विखे, क्षीरसागर, महातेकर यांना हायकोर्टाची नोटीस

राज्यात झालेल्या मराठा आंदोलनानंतर गेल्यावर्षी मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते आणि अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे आरक्षण बेकायदा आणि घटनेतील तरतुदींच्याविरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गेल्या महिन्यात न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. येत्या गुरुवारी हा निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.