पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलढाणाः बोलेरो-कंटेनरच्या अपघातात ४ जण ठार

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

मेहकरजवळील (जि. बुलढाणा) अंजनी खुर्द येथे बोलेरो व कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नागपूर औरंगाबाद मार्गावर हा अपघात झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मृतात कन्नड येथील क्षीरसागर कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

हिमाचल प्रदेश : कुल्लू जिल्ह्यात बस दरीत कोसळून ४३ जणांचा मृत्यू

अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कन्नड येथील क्षीरसागर कुटुंब मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. परत येताना हा अपघात झाला. 

पुणेकरांना हेल्मेट वापरावेच लागणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

या अपघातात आई, वडील, मुलगी, व बोलेरो चालक जागीच ठार झाले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.