पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: खेड्याकडे परत चला

मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीस विरोध केला जात आहे

या आठवड्यात पर्यावरण संदर्भात एक मोठे वादळ उठलेलं आपण पाहत आहोत. एका बाजूला वृक्षतोड संदर्भात आंदोलन करण्याचा प्रयत्न. दुसर्‍या बाजूला पावसाळा ऑक्टोबर अखेरीपर्यंत राहण्याची शक्यता. या बातमी मागील बातमीचा अन्वयार्थ लावायचा म्हटलं तर एवढाच लावता येईल निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. हवामानाचे पॅटर्न बदलत चालले आहेत आणि या बदलाच्या प्रक्रियेच्या मुळाशी फक्त आणि फक्त माणूसच आहे. 

BLOG: शेती, पर्यावरण आणि समाजाची भूमिका

हे सर्व घडवण्याला दुर्दैवी शिल्पकार आपणच आहोत. एका बाजूला २०% तरी वनक्षेत्र असले पाहिजे, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या घराशेजारी माझ्या शेतामध्ये जेवढी झाडे कमी तेवढे चांगलं म्हणत वृक्षतोड करायची ही मानसिकता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. 'शिवाजी जन्मला पाहिजे पण शेजारच्या घरात' ही मानसिकता जगभरात पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. फक्त विषय चर्चा, चर्चा आणि चर्चा यावरच बऱ्यापैकी थांबत आहे. आता वेळ आहे कृती करण्याची. ढासळलेले पर्यावरण मनुष्यजातीचा विनाश अटळ होण्याच्या दिशेने घेऊन जात आहे. जर हे टाळायचं असेल तर तात्काळ गांधीजींनी सांगितलेल्या 'खेड्याकडे परत चला' या गोष्टीवर गांभीर्याने काम करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज दर्शवत आहे. १०० वर्षांपूर्वी खेड्याकडे परत चला हा मंत्र दिला गेला होता. तो खऱ्या अर्थाने अजूनही आम्ही समजून घेतलाच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे वाटते. 

BLOG: बा सरकार, हे वागणं बरं न्हाई !

खेड्याकडे परत चला हे थोडं समजून घेऊया.. पुर्वीच्या काळी खेडी कशी होती ? प्रत्येक गाव गावासाठी सामुदायिक पाणवठा, गावाच्या बाजूला गर्द वनराई यांना बऱ्याच वेळा आमराई म्हटलं जायचं. या आमराया म्हणजे अनेक फळझाडांच्या घनदाट 'मिनी' वनक्षेत्र म्हटलं तरी हरकत नाही. दुपारच्या वेळी सर्व गावकरी या झाडांच्या आश्रयाने सावलीत बसून सोबतीने मिळून मिसळून राहायचे आणि यातच गावाचा एकोपा टिकून रहायचा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हे खर्‍या अर्थाने प्रत्येक गावागावात अनुभवायला मिळायचं. आता वनराई सोडा पण सिमेंटच्या गावांमध्ये पूर्ण गावात आणि गावशिवारात शे-दोनशे झाडे मिळणं पण अवघड झालं आहे. शहराबद्दल चर्चा करणं तर व्यर्थच आहे. क्वचितच काही शहरं सोडली तर बहुतांशी शहरे हे भकास, कंगाल आणि वृक्ष विरहीत आहेत. येथे कंगाल पण हे पर्यावरण दृष्टी मानत आहे. त्यामुळे खेड्याकडे परत चलाचा पहिला अर्थ पूर्वीच्या काळी जी पर्यावरण समृद्ध होती. ती व्यवस्था परत एकदा निर्माण करणं.

BLOG : शतकातील महानायक- अमिताभ बच्चन

पूर्वीच्या काळी शेती कुटुंबव्यवस्थेला समोर धरून केली जात होती. गाव गाड्याला नजरेसमोर ठेऊन केली जात होती. यामध्ये गावांच्या गरजा गावांमध्येच पूर्ण होतील यावर गावकऱ्यांचे एकमत होते. पीक-पाणी पद्धती ही त्याला अनुरूप होती. त्यामुळे गावातच सर्व तृणधान्य, कडधान्य, डाळी, भाजीपाला, फळे, दूध हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असायचे. दुसऱ्या बाजूला बारा बलुतेदारच्या माध्यमातून पूरक गरजा पूर्ण होण्याचे संसाधने उपलब्ध असायची. अगदी तीन ते चार गावांच्यामध्ये कुठे ना कुठे तेलघाणी असायची आणि स्थानिक पातळीवर उत्पादीत केलेल्या शेंगदाणे, करडई, सूर्यफूल याचे उच्च दर्जाचे बिनविषारी तेल घरोघरी आणि अगदी गरीब गरिबाला ही उपलब्ध होत असायचे. संधी असायची आता मात्र बहुतांशी शेतकरी हे कुटुंब प्रथम ही व्याख्या पैसा प्रथम जोडून नगदी पिके घेताना दिसत आहेत. वारंवार पैसा आणि पैसा भोवतीच सामाजिक संतुलन फिरताना दिसत असल्यामुळे स्वाभाविकपणे शेतकरीही पैसा आधारित शेती करत आहे. हे करताना त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या आणि त्याच्याकडेच असणाऱ्या जमीन, जनावरे यामाध्यमातून स्वतःच्या पूर्ण होणाऱ्या या गरजा पूर्ण न करता त्यासाठी पण तो परावलंबी झाला आहे.

स्वतःच्या कुटुंबाला पुरेसा भाजीपाला आणि कडधान्य तेलबिया पिकवतात त्या विकत आणून खाल्ल्यावरच त्याचा भर आहे दुर्दैवाने ही परिस्थिती पर्यावरणासाठी अनुकूल नाही आपल्या कुटुंबाच्या घरचा आपणच पूर्ण कराव्यात आणि स्वयंपूर्णता आणावी यावर आता गांभीर्याने सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे .

BLOG: निवडणुकांचा काळ सुखाचा

खेड्याकडे चला याचा दुसरा अर्थ हाच आहे स्वयंपूर्णता. या स्वयंपूर्णतेचा विचार आता गावांनी पण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तसेच शहरवासीयांनी आता गावांना जोडून घेऊन काही दिवस जाऊन पर्यावरण संगोपनासाठी आपण जे जे योगदान देऊ शकतो, ते उपलब्ध असणाऱ्या स्वतःकडील साधनांसोबत देणे काळाची गरज बनली आहे. मी माझ्याकडील चारचाकी गरज असेल तरच वापरेन, माझ्या घराभोवती माझ्या गल्लीत जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे प्रतिमाणसी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करेन, ही प्रतिज्ञा प्रत्येकाने करावी लागेल. त्यासाठी ठरवून प्रयत्न करावे लागतील. हे पण एक मोठे योगदान आपल्या शहरांना गावाकडे परत चला म्हणण्याच्या प्रक्रियेतील असेल.

त्या साठी गरज आहे, पर्यावरण निसर्ग आणि पारंपरिक जीवन पद्धतीतील एकात्मता समजून घेण्याची. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याची. आपल्या कुटुंबातील नवीन पिढीला लहानपणापासूनच निसर्गाजवळ घेऊन जाण्याची. यासाठी दत्तक झाड उपक्रम, झाड माझा भाऊ, उपक्रम यासारखे उपक्रम आपल्या घरात गल्लीत शाळेत राहून मुलांना पर्यावरणस्नेही बनवल्यास खेड्याकडे चला या वाक्यातील मतितार्थ खऱ्या अर्थाने सार्थ होईल 

BLOG: कायदा सोडून बोला- ही मानसिकता होत आहे का?

चला तर मग खेड्याकडे परत !! मी माझ्या मुलांसाठी ५६० झाडे लावून त्यांची दहा वर्षांपासून जोपासना करत आहे. पुढील पिढीचे सुजाण पालकत्व म्हणून मी हे करत आहे, आपणही हे करणार का?, असाल तर शुभेच्छा! खेड्याकडे परत चला चला जग वाचवूया...

-गोरक्षनाथ भांगे, (कृषी अभ्यासक) 
godsentguru@gmail.com