पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये सौरऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, दोन जखमी

भिवंडीतील गोदामाला आग

बीडमध्ये सौरऊर्जा प्रकल्पामध्ये मोठा स्फोट झाला. धारूर तालुक्यातील चाटगावात ही घटना घडली आहे. हा स्फोट शुक्रवारी पहाटे ३ वाजता झाला. दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये  एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  

मोदींना पत्र लिहिणाऱ्या ४९ जणांच्या भूमिकेवर ६१ कलाकारांचं प्रश्नचिन्ह

चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सौरउर्जा प्रकल्प' आहे. या सौरउर्जा प्रकल्पामध्ये शुक्रवारी पहाटे बिघाड झाला. दुरुस्तीचे काम करण्यासाठी जयराज जया बालन (वय २७), रामानंद रामरतन खारवाल (वय २३) आणि संपत कमलाकर शिंदे (वय २३) हे तीन कामगार गेले होते. दुरुस्तीचे काम सुरु असतानाच मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. यामधील जयराम १०० टक्के तर रामानंद आणि संपत हे दोघे ५० टक्के भाजले. 

मुंबई विमानतळावर 'ध' चा 'मा', 'बॉम्बे' म्हटल्याचे ऐकले 'बॉम्ब है'

दरम्यान, जखमी झालेल्या तिघांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान जयराम याचा मृत्यू झाला. तर रामानंद आणि संपत यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटाचा आवाजाने आसपासची गावं हादरली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बीड पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. 

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीच्या पत्रातून पुढे आली धक्कादायक माहिती!