पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एक देश, एकाचवेळी निवडणूक' संकल्पना अंमलात आणणे अशक्य - संजय राऊत

संजय राऊत

'एक देश, एकाचवेळी निवडणूक' ही संकल्पना वास्तवात आणणे अशक्य असल्याचे आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नुकसान होईल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. पण भाजपचा महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी या संकल्पनेसंदर्भात व्यक्त केलेल्या मतामुळे भविष्यात मित्रपक्षांकडूनही या संकल्पनेला विरोधच केला जाईल, असे दिसते. 

संजय राऊत यांनी या योजनेच्या अंमलबजवाणीबद्दलही शंका व्यक्त केली आहे. या संदर्भात ते म्हणाले, एक देश, एकाचवेळी निवडणूक या संकल्पनेवर चर्चा होण्याची गरज आहे. भारतासारख्या मोठ्या देशात एका मताने सरकार तयार होते किंवा पाडलेही जाऊ शकते. मग अशा स्थितीत एक देश, एकाचवेळी निवडणूक शक्य असेल का?. जर सरकार पडले, तर त्या ठिकाणी तीन वर्षांसाठी राष्ट्रपती राजवट राहू शकत नाही. या संकल्पनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. व्यवहारदृष्ट्या या संकल्पनेची अंमलबजावणी करणे सध्यातरी अशक्य असल्याचे मला दिसते. 

शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मतांनुसार, एक देश, एकाचवेळी निवडणूक ही संकल्पना राष्ट्रीय पक्षांच्या फायद्याची आहे. पण यामुळे प्रादेशिक पक्षांचा तोटा होऊ शकतो. शिवसेनेला यामुळे फटका बसू शकतो. 

संघ 'डिजिटल'!, मोहन भागवतांसह अनेक नेते टि्वटरवर

शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत म्हणाले, या संदर्भात अजून आमच्या पक्षाने आपली भूमिका केंद्र सरकारकडे मांडलेली नाही. ज्यावेळी केंद्रातील आणि राज्यातील निवडणुका एकाचवेळी होतात. त्यावेळी त्या राष्ट्रीय प्रश्नांवर लढविल्या जातात. या स्थितीत प्रादेशिक पक्षांचा तोटा होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही या संकल्पने संदर्भातील सर्व मुद्दे संबंधित समितीपुढे सविस्तरपणे मांडू, असे त्यांनी सांगितले.

'औरंगाबाद' पुसून 'संभाजीनगर' करण्याचा प्रयत्न, पोलिस तपास सुरू

जर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी झाली, तर या स्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनच्या वापराबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल आत्ताच खूप शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे या पद्धतीने मतदानात बदल केले पाहिजेत. मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्यात काहीही गैर नाही. निवडणुकीची हिच पद्धत अधिक विश्वासार्ह आहे. यामुळे मतदारांचा विश्वास कायम राहतो, असे विनायक राऊत म्हणाले.