पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप आक्रमक: २२ फेब्रवारीला राज्यव्यापी आंदोलन

चंद्रकांत पाटील (ANI)

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्येविरोधात भाजपने येत्या शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी) राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हा मुख्यालयांसमोर दिवसभर आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

सेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली:चंद्रकांत पाटील

विशेष म्हणजे येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वीच आंदोलन करुन राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. नवी मुंबई येथील अधिवेशनातही चंद्रकांत पाटील यांनी भाजप आता प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. 

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा झाले दिल्लीचे मुख्यमंत्री

राज्यातील महिला संकटात असून त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालये आणि जिल्हा कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारला सुध्दा स्वतंत्र चौकशीचा अधिकार: शरद पवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP to stage a statewide protest on February 22 against the maharashtra Government over security of women and farmers issues