पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षा केली परत

चंद्रकांत पाटील

कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आणीबाणीच्या क्षणी पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताणही प्रचंड वाढला आहे. जागोजागी बंदोबस्त, गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. याचदरम्यान, राज्याचे माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली सुरक्षा स्वतःहून परत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकमेकांजवळ बसल्यास ६ महिने शिक्षा आणि दंड, ... या देशात नवा नियम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे. याचा पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. याचा विचार करुन परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मी माझी सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी टि्वट केले आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी भाजप गरीबांना वाटणार 'मोदी किट'

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक जबाबदारी स्वीकारत राज्य आणि केंद्राला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलाय. विधीमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयापाठोपाठ शिवसेनेही आपल्या आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले. ही मदत जाहीर करताना कोरोना विरुध्दच्या लढाईत हा आमचा खारीचा वाटा आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.