पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले

रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर वगळता राज्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही. सोलापुरातही भाजपचा उमेदवार येईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर येथे व्यक्त केला. ते सोलापूर येथे बोलत होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग झाला तर त्याचे स्वागतच असेल, कारण त्यांच्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या जास्त  जागा निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी केला. 

वंचित आघाडी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणारः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांना राजकीय कल समजून घेता आला नाही. खरे तर वंचित आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही, असे भाकित आठवले यांनी वर्तवले. 

पंतप्रधानपदासाठी पवारांना विरोध, मायावतींना पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

महायुतीला लोकसभेत २६० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे सांगत. आगामी विधानसभेतही महायुतीसोबतच आपण राहणार आहोत. निवडणूक चिन्ह आपण निवडू, असे ते म्हणाले.