पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात: रणजितसिंह निंबाळकर

रणजितसिंह नाईक निंबाळकर

'राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात', असल्याचा दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकरांनी केला आहे. दरम्यान, भाजपचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. तसंच, राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपमध्ये आल्यानंतर या मतदार संघामध्ये पोटनिवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला एकही उमेदवार मिळणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

राज्यामध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशामध्ये सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना रणजितसिंह निंबाळकरांनी राष्ट्रवादीचेच ९ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

उद्धव ठाकरेंकडून आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश

माढा येथे दौऱ्यावर असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, 'भाजपचा एकही आमदार राष्ट्रवादी काय इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. तर राष्ट्रवादीचेच ९ आमदार माझ्या संपर्कात आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळ आली की हे आमदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येतील', असे त्यांनी सांगितले. 

'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई