पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला!

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी याचे जात प्रमाणपत्र सोलापूरातील जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. खासदारकी वाचवण्यसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला हरवला आहे. याप्रकरणी त्यांनी वळसंग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

'आप'चा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा: केजरीवाल

९ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला हरवल्याचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्यांनीच ही तक्रार दाखल केली होती. १५ फेब्रुवारी रोजी जयसिद्धेश्वर महास्वामींच्या जात प्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समिती समोर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांच्या वकिलांनी जातीचा दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती दिली होती. सुनावणीच्या आदल्यादिवशीच त्यांनी जातीचा दाखला हरवल्याची तक्रार दिल्याने जातीचा दाखला नेमका आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

दरम्यान, जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला होता. त्यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने सांगितले होते. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर  महास्वामी यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. मात्र खासदारांनी आधीच दाखला रद्द झाल्याची तक्रार दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते.  याप्रकरणी प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती.

दिल्ली हिंसाचार: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp mp jai siddheshwar shivacharya cast certificate lost during traveling lodged police complaints