नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे विरोधक आक्रमक दिसले. भाजपचे सर्व आमदार 'मी पण सावरकर' असे लिहिलेली टोपी घालून विधिमंडळात दाखल झाले. सर्वांनी राहुल गांधी आणि शिवसेनाविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफीची मागणी भाजपने केली. पहिल्याच दिवशी भाजपचा हा पवित्रा पाहता हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
आता आणखी एक राजकीय भूकंप होणार, रामदास आठवलेंचा इशारा
Nagpur: BJP MLAs including former Chief Minister Devendra Fadnavis arrive for assembly's winter session wearing 'I am Savarkar' caps https://t.co/wNyohx585c pic.twitter.com/ZAtmdoglDx
— ANI (@ANI) December 16, 2019
विधिमंडळाबाहेर भाजपचे सर्व आमदार हे भगव्या रंगाची आणि त्यावर 'मी पण सावरकर' असे लिहिलेली टोपी घातली होती. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोप आमदारांनी केला. सावरकरांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याची तयारी सुरु
यावेळी आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधातही घोषणाबाजी केली. 'सोनिया गांधी प्रणित शिवसेनेचा धिक्कार असो', 'होश मैं आओ, होश मैं आओ उद्धव ठाकरे होश मैं आओ' अशा घोषणा दिल्या.