पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमदारांसमोर कार्यकर्त्यांची दादागिरी; आगार व्यवस्थापकाला मारहाण

भाजप कार्यकर्त्यांची आगार व्यवस्थापकाला मारहाण

बुलडाण्यामध्ये भाजप आमदारासमोर कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. खामगाव येथील आगार व्यवस्थापकाला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. आगार व्यवस्थापकाविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर भाजप आमदार आकाश फुंडकर कार्यकर्त्यांसोबत जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी थेट आगार व्यवस्थापकाला मारहाण केली. 

अहमदनगरमध्ये बॉम्बच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

खामगाव आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे याचा गेल्या अनेक दिवसांपासून मनमानी कारभार सुरु आहे. कर्मचाऱ्यांना त्रास देणे, त्यांची ड्युटी लावण्यासाठी पैशांची मागणी करणे, पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त बस न सोडता वारकऱ्यांची अडवणूक करणे, कार्यालयात मद्य प्राशन करणे अशा वेगवेगळ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी एक दिवस आगार बंद आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि आगार व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी आमदार आकाश फुंडकर गेले होते. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते देखील होते. 

राहुल गांधींचे ट्विटरवर १ कोटी फॉलोअर्स, अमेठीत करणार जल्लोष

आगार व्यवस्थापक रितेश यांना जाब विचारत असताना भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी रितेश यांच्या अंगावर ऑइल फेकत त्यांना मारहाण केली. दरम्यान, भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे आगार व्यवस्थापकाविरोधात तक्रार करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. तसंच जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी आगारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, आगार व्यवस्थापकाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत ठिय्या आंदोलन मागे घेतले.