पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात युतीमध्ये कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यापूर्वी 'आमचं ठरलंय' असं एका व्यासपीठावरुन सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत सर्व काही ठिक असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे युतीमध्ये पुन्हा जागावाटपावरुन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की, युतीमध्ये जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. सध्या आमदार असलेल्या जागांवर दावा सांगू नये, असे सांगत त्यांनी शिवसेनेला समान जागा मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत दिले आहेत. 

आमचं ठरलंय! आधी प्रचंड बहुमतानं विजय मिळवू : फडणवीस

परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा आणि विधानसभेसाठी युती केली होती. विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती करण्यात आली होती.  

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात वाघ आणि सिंहाची जोडी एकत्र आल्यावर राज्य कुणाचे असते हे आपण पाहिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या यशाचा दाखला दिला होता. तर उद्धव यांनी आमचं ठरलंय असे सांगत शिवसेना भाजपची मनं जुळली असल्याचे सांगितले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अगोदर प्रचंड बहुमतानं निवडून यायच आमचं ठरलंय, असाही उल्लेख केला होता. 

मनं जुळली आता एका युतीची दुसरी गोष्ट : उद्धव ठाकरे
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP minister and new state chief of Bjp Chandrakant Patil statment ON BJP Shiv Sena formula for Maharashtra assembly elections 2019