पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रावसाहेब दानवे यांचा भाजप प्रदेशाध्यपदाचा राजीनामा

रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद बोलावून त्यांनी याची घोषणा केली. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राज्यातील पक्ष नेतृत्वात बदल करण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती. 

काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना भाजपत घ्या, दानवेंचा सल्ला

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. नंतर काही महिन्यातच त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर काही दिवसातच त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला घवघवीत यश मिळाले. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होणार हे निश्चित होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी आज राजीनामा दिला.

गतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे