पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली; सुधीर मुनगंटीवारांची शिवसेनेवर टीका

सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणे हे २१ व्या शतकातले मोठे आश्चर्य, असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दोन्ही पक्ष भिन्न विचाराचे आहेत. त्यांची विचारसरणी कधीच एक होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अशोक चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुस्लिमांच्या मागणीसाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. काँग्रेस शिवसेनेकडून त्यांना जसे हवे तसे वधवून आणि लिहून घेतात. म्हणून मुंबईमधील शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि आता दिल्लीतील मातोश्री शक्तीशाली झाली, असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

'नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदींचे विचार एकसारखेच'

शिवसेना आणि भारतीय जनात पक्ष नैसर्गिक मित्र होते. शेवटी राजकारणात शत्रुत्वाची भावना घेऊन काम करता येत नाही. शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजपकडून अडचण येण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले. तरीही भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत इच्छुक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे ठरणारे पाच मुद्दे

दरम्यान, मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मनसेचा आणि आमचा कोणताही प्रस्ताव नाही. जो मोदींवर विश्वास ठेवेल. भाजपवर आणि देशहितावर विश्वास ठेवेल. या देशाचा विचार करणारा कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष याला सोबत घेण्यात कधीच अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यामांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

महात्मा गांधी स्मृतिदिन: मोदींसह दिग्गजांकडून राजघाटावर श्रद्धांजली