पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलींना नव्हे मुलांना शपथ द्यायला पाहिजे: पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंनी अमरावतीच्या महाविद्यालयातील प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.म

प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ज्या दिवसाची निवड करतात त्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी अमरावतीच्या एका महाविद्यालयात अनोखे चित्र पाहायला मिळाले. चांदुर येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी  जागतिक प्रेमदिनी प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा अनोखा निर्धार केला. विद्यार्थींना देण्यात आलेल्या या शपथीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिले शपथविधीचे निमंत्रण

पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, अमरावतीमधील महिला आणि कला महाविद्यालयातील प्रकार हा हास्यास्पद आहे. प्रेमात पडायचे नाही आणि प्रेम विवाह करायचा नाही, अशा प्रकारची शपथ फक्त मुलीनींच का घ्यावी?  मुलींच्या ऐवजी मुलांना शपथ देण्याची गरज आहे, असा उल्लेखही त्यांनी एका ट्विटमध्ये केलाय.

निर्भया प्रकरणः सुनावणीदरम्यान न्या. भानुमती यांना आली

एकतर्फी प्रेमातून मुलीवर अ‍ॅसिड हल्ला करणार नाही. त्यांना जिंवत जाळण्याचा प्रकार माझ्याकडून घडणार नाही. तसेच मुलींकडे वाईट नजरेनं पाहणार नाही, अशी शपथ मुलांना द्यायला हवी, असे मत पंकजा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. अमरावतीतील प्रकारावर वाद निर्माण झाल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले होते. सध्याच्या घडीला मुला-मुलींमधील प्रेम प्रकरणाच्या घटना वाढताना दिसत आहेत. हुंड्याची प्रथा देखील आहे. यासारख्या घटना नियंत्रित आणण्याच्या हेतून महाविद्यालयाने अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबला, असे महाविद्यालयीन प्रशासनाने म्हटले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bjp leader pankaja munde tweet reaction on maharashtra amravati teachers students love marriage oath