पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर; चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या आजारी आहेत

पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीस गैरहजर राहिल्या. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या बैठकीला आले नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांनी या पूर्वीच बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगत परवानगीही घेतली होती, असेही पाटील यांनी माध्यमांना सांगितले. 

नाराज एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातच त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट टाकून येत्या १२ तारखेला महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली होती.

पंकजा मुंडे बैठकीला न आल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, बैठकीसाठी औरंगाबादला येण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या बोलणे झाले होते. त्या आजारी आहेत. त्याचबरोबर १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्याची तयारी सुरु आहे. पूर्वपरवानगी घेऊनच त्या अनुपस्थित राहिल्या आहेत. दोन दिवसांनंतर परळी येथे जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

हैदराबाद एनकाऊंटरः '१३ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा'

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या टि्वटर हँडलवरुन भाजप शब्द हटवला होता. त्यामुळे त्या भाजप सोडण्याच्या चर्चांना ऊत आला होता. परंतु, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पक्ष बदलणे आपल्या रक्तात नसल्याचे त्यांनी म्हटले होते. येत्या १२ तारखेला त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तिथे त्या एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट