पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रशासनाची ABCD माहीत नाही ते निर्णय काय घेणार? राणेंचा ठाकरेंना टोला

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेले सरकार हे राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. प्रशासनाची एबीसीडी माहीत नसलेल्या माणूस मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. कणवली येथील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. 

दिल्ली अग्नितांडवः मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देणार-केजरीवाल

नाराययण राणे म्हणाले, २८ तारखेला सरकार स्थापन झाले मात्र अद्याप त्यांना खातेवाटप करता आलेले नाही. मंत्रिपदावरुन तिन्ही पक्षात एकमत नाही.  यावरून सरकारला निर्णय घेता येत नाहीत हे दिसून येते. हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही तर महाराष्ट्राकडून कमवायच्या उद्देशाने सत्तेत आले आहे. महाविकास आघाडी सरकारला स्थगिती सरकार असल्याचेही म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच काही प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. यावरुनच त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.  

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

मेट्रोसाठी जागतिक बँकेकडून निधी आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या कामाला स्थगिती दिल्यानंतर  ठेकेदाराला पैसे द्यावे लागतील याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. ठेकेदार व्याजासह पैसे मागू शकतो, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. विकासाबाबतीत केलेला अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.  

अजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ता नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले १२ आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राणेंनी महाविकास आघाडीतील नेतेच आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले. शिवसेनेचे आमदार पहिल्या क्रमांकावर असून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.