पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'

नारायण राणे

बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते आणि अशी आघाडी सुध्दा झाली नसती. तसंच उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्री पदासाठी केली असल्याची टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी आज नागपूर येथे भाजपच्या आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'

हे अधिवेशन नियमाला धरुन नाही. नागपूरात हिवाळी अधिवेशनासारखे वाटत नसून एकादा घरगुती कार्यक्रम असल्यासारखे वाटत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. सत्तेसाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ५ दिवसांच्या अधिवेशनात सरकारने जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. या अधिवेशनात अनेक प्रथा, परंपरा, नियमांना गुंडाळले जात असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

देशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी

मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ अजून जाहीर केले नाही. खाते वाटप सुध्दा अजून केली नाही. अधिवेशनात प्रश्नोत्तर होत नाही, कामकाज व्हायला पाहिजे तसे होत नाही. ज्यांच्यात प्रश्न सोडवण्याची धमक आहे असा मुख्यमंत्री मिळाला तर महाराष्ट्र चालेल. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा. अन्यथा महाराष्ट्र अदोगतीला जाईल, अशी टीका नारायण राणेंनी केली. 

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार