पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं: एकनाथ खडसे

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असून वारंवार ते आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वावर ते वारंवार टीका करत आहेत. आतापर्यंत अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या खडसेंनी आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे नाव घेत टीका केली आहे. स्वत:चे राजकारण सरळ करुन घेण्यासाठी फडणवीस आणि महाजन यांनी जाणीवपूर्वक माझं तिकीट कापलं असल्याचा खळबळजनक आरोप खडसेंनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना खडसेंनी हे आरोप केले आहेत. 

'ठाकरे सरकार मुंबई नव्हे दिल्लीतील 'मातोश्री'च्या आदेशावर चालेल'

'मी गेली ४० वर्ष राजकारणात असल्याने मी राजकारणापासून कधीही दूर राहू शकत नाही. मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडले पाहिजे अशा विचारांचा मी आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसंच, जळगाव जिल्हा परिषदेतवर भाजपची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला आहे.  

खातेवाटपासंदर्भात अजित पवार म्हणाले, तुटेपर्यंत ताणायचं नसतं

दरम्यान, मी जेपी नड्डा यांची भेट घेऊन सगळं सांगितले आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे खडसेंनी सांगितले. तसंच, मी भाजपात आहे आणि भाजपमध्ये राहणार आहे. सध्या मी पदावर नसलो तरी पक्षासाठी काम करत आहे. मतदारसंघामध्ये फिरुन जनतेची कामं करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकरत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे खडसे यांनी सांगितले. 

दहशतवाद्यांशी लढताना साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण